साडे चार लाखांत महिंद्राची नवी SUV 'KUV100' लॉन्च

पुणे : भारतीय वाहननिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिंद्रा कंपनीने नुकतीच, पहिल्यांदाच गाडी खरेदी करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन एक नवीन गाडी बाजारात उतरवली आहे.

Updated: Jan 15, 2016, 07:51 PM IST
साडे चार लाखांत महिंद्राची नवी SUV 'KUV100' लॉन्च  title=

पुणे : भारतीय वाहननिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिंद्रा कंपनीने नुकतीच, पहिल्यांदाच गाडी खरेदी करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन एक नवीन गाडी बाजारात उतरवली आहे. 'KUV100' असं या नवीन गाडीचं नाव आहे

यामध्ये ११९८ सीसीचं इंजिन देण्यात आलंय. KUV100 ला  कंपनीनं के2, के2प्‍लस, के4, के4 प्‍लस, के6 और के8 नाम से 7 अशा वेगवेगळ्या व्हेरिएन्टमध्ये बाजारात उतरवलंय. 



कंपनीच्या माहितीनुसार, गेली चार वर्षे यावर काम सुरू असून कंपनीने आजवर १२०० रुपयांची गुंतवणूक केली आहे. 

मारुतीची 'स्विफ्ट' किंवा ह्युंडाईची 'आय १०' घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यातचा कंपनीचा मानस आहे.  

या गाडीची किंमत ४.४२ लाख रुपयांपासून सुरू होतेय... वेगवेगळ्या व्हेरियन्टमध्ये आणि सुविधांमध्ये ही गाड़ी ६.७६ लाखांत उपलब्ध होऊ शकेल. सर्वात कमी किंमत पेट्रोल व्हर्जन गाड्यांची आहे तर डिझेल व्हर्जनसाठी कमी कमी ५.२२ लाख रुपये आहे. 

डेज़लिंग सिल्वर, एक्वामरीन ब्लू पर्ल व्हाइट, डिजाइनर ग्रे, फिएरी ऑरेंज, फ्लैमबॉएंट रेड और मिडनाइट ब्लैक अशा सात रंगांत ही गाडी उपलब्ध असेल.