कॅलिफोर्निया : फेसबुकचा जनक मार्क झुकरबर्गचं नाव तरूण अतिशय आदराने घेतात. फेसबुकच्या वॉलवर भावनांना वाट करुन देणारा 'मार्क झुकरबर्ग' हा अल्पावधीत लोकप्रिय झाला.
मात्र, फेसबुकच्या एका माजी कर्मचाऱ्यांने लिहलेल्या एका पुस्तकात त्याच्या कठोरपणाचा खुलासा केला आहे. काही वेळेस झुकरबर्ग हा कर्मचाऱ्यांना तलवारीने त्यांचे मुंडके छाटण्याची धमकी द्यायचा, असा दावा या कर्मचाऱ्याने पुस्तकात केलाय.
फेसबुकच्या सुरवातीच्या दिवसात काम करणाऱ्या नोआ केगन या माजी कर्मचाऱ्याने हे पुस्तक लिहले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, झुकरबर्गची कंपनी आणि त्याचे मॅनेजमेंट जेव्हा फारच लहान होते आणि त्यावेळेस जेव्हा कोणी कामामध्ये कुचराई केल्यास तो त्याच्या कर्मचाऱ्यांना जपानी समुराई तलवारीने कापून टाकण्याची धमकी देत असे.
केगानच्या मते, कामामधील शिथिलता त्याला कधीच खपत नसे, त्यावेळेस तो चिडून अशाप्रकारची धमकी कर्मचाऱ्यांना द्यायचा.
'मला माहित नाही त्याला ही तलवार त्याला कोठून मिळाली होती. माझं नशीब चांगलं होतं की, मी असेपर्यंत तरी तेथील कर्मचाऱ्यावर त्याने याचा प्रयोग केला नव्हता.' असंही तो गमतीत सांगतो.
केगनच्या मते, झुकरबर्गला कामामध्ये केलेली कुचराई आवडत नसे, त्यावेळेस मग तो एखाद्या कर्मचाऱ्याचा पाणउतारा करायला देखील मागे-पुढे पाहत नसे.
नोआ केगन २००६ मध्ये फेसबुकमध्ये रुजू झाला होता. त्यावेळेस या कंपनीला अवघा एक वर्ष झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.