नवी दिल्ली : एलजीचा क्रोमबेस ऑल ईन वन कॉम्प्युटर बाजारात् दाखल झाला आहे. एलजी या इलेक्टॉनिक्स कंपनीने आपल्या पहिल्या क्रोमबेस ऑल ईन वन भारतात लाँच केलाय.
या संगणकाचे मॉडेल-22 सीव्ही 241 असून हा कॉम्प्युटर गुगलच्या क्रोम ऑपरेटींग सिस्टमवर चालतो. 4 जनरेशन इंटेल सीपीयु, 2 जीबी रॅम, 16 जीबी आय. एस. एसडी स्टोरेज, मायक्रोफोन, वेबकॅम 1.3 एम, 720 एचडी, पोर्ट्स-एचडीएमआय, युएसबी 2 आणि 3,5 वॅट स्पिकर, वायर्ड किबोर्ड, माऊस असणार आहे.
या कॉम्प्युटरची साधारण किंमत 32,000 रुपये इतकी आहे. सिल्वर आणि व्हाईट रंगात उपलब्ध हा संगणक उपलब्ध आहे.
भारतातील कॉम्प्युटर युजर्स आणि कॉम्प्युटर वापरण्यात येणाऱ्या विविध क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन क्रोमबेस ऑल ईन वन कॉम्प्युटरची निर्मिती करण्यात आलेली आहे, असे कंपनीचे व्यवस्थापक सून क्वॉन यांनी सांगितले.
वैशिष्ट्ये :
- एक वर्षाची वॉरंटी असून रिडरमोड मिनीमल फ्लिकर. वायरस फ्लिकर. वायरस फ्री कॉम्प्युटर गुगल ड्राईव्हवर 100 जीबी स्पेस मोफत मिळेल.
- हा कॉम्प्युटर गुगलक्रोमच्या ऑपरेटींग सिस्टमवर चालतो. ग्राहकांना हा कॉम्प्युटर हाताळण्यासाठी सोपा, वेगवान, शक्तिशाली आहे.
- 21.5 इंच एचडी डिस्प्ले 1920 X 1080 रेझोल्युशन डिस्प्ले, एचडीआयपीएस आणि स्पेस सेव्हींग डिझाईन असेल.
- पॉवरफुल आर्किटेक्चर आणि गुगल, जीमेल, गुगलड्राईव्ह, मॅप्स, युटय़ूब, हँगआऊट आदी अॅप्लिकेशन असतील.
- गुगल क्रोम स्टोअर्समधील हजारोवेब अॅप्लिकेशन मोफत
- रोबस्ट बिल्टईन सिक्युरिटी अपडेटसह सॉफ्टवेअरची सुविधा, अॅण्टीवायरसची गरज भासणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.