मारूतीची नवी कार देणार ३० किमी/लीटरचा मायलेज

मारूती-सुझुकी पुढील दोन महिन्यात देशातील सर्वात लहान आणि किफायतशीर ८०० सीसीचं डिझल इंजिन असणारी कार बाजारात उतरवणार आहे. हे इंजिन पहिल्यांदा सेलेरिओ कारसोबत लॉन्च केलं जाणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार ही कार ३० किमीचा मायलेज देऊ शकते. 

Updated: Apr 28, 2015, 02:36 PM IST
मारूतीची नवी कार देणार ३० किमी/लीटरचा मायलेज  title=

नवी दिल्ली: मारूती-सुझुकी पुढील दोन महिन्यात देशातील सर्वात लहान आणि किफायतशीर ८०० सीसीचं डिझल इंजिन असणारी कार बाजारात उतरवणार आहे. हे इंजिन पहिल्यांदा सेलेरिओ कारसोबत लॉन्च केलं जाणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार ही कार ३० किमीचा मायलेज देऊ शकते. 

हे इंजिन सुझुकी कंपनीनं बनवलं आहे. ही कंपनी या क्षेत्रात बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे. सध्या मारूती विकत असलेल्या डिझल कारचं इंजिन १३०० सीसी आहे. हे इंजिन इटलीतील फिअॅट कंपनी बनवते. मारूती फिअॅट आणि टाटा कंपनीकडूनही डिझल इंजिन इम्पोर्ट करतं.

सुझुकीनं बनवलेलं हे इंजिन किफायतशीर आणि छोटं असणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार हे इंजिन ३० किमी प्रती लीटर मायलेज देईल. छोटी कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही सर्वात आकर्षणाची बाब असेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.