मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर Lumia 520ची किंमत 8 मिलियन

मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोनची किंमत फरारीच्या 6.5 कोटीची कार LaFerrari पेक्षाही जास्त पाहायला मिळाली. कंपनीच्या बजेट स्मार्टफोन ल्युमिया 520ची किंमत कंपनीच्या वेबसाइटवर ऑफरसह 8 मिलियन डॉलर लिहिली गेली.

Updated: Oct 19, 2015, 04:41 PM IST
मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर Lumia 520ची किंमत 8 मिलियन  title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई: मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोनची किंमत फरारीच्या 6.5 कोटीची कार LaFerrari पेक्षाही जास्त पाहायला मिळाली. कंपनीच्या बजेट स्मार्टफोन ल्युमिया 520ची किंमत कंपनीच्या वेबसाइटवर ऑफरसह 8 मिलियन डॉलर लिहिली गेली.

आणखी वाचा - यू-ट्यूब व्हिडीओ पाहतांना शॉट किज् वापरा, वेळ वाचवा

खरं तर हा स्मार्टफोन मायक्रोसॉफ्टचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, ज्याची खरी किंमत 140 डॉलर (9067 रुपये) आहे. या 512MB रॅम असलेला स्मार्टफोन एप्रिल 2013मध्ये लॉन्च केला गेला होती. ज्यात 5 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 1,430mAhची बॅटरी आहे.

आणखी वाचा - एअरसेल संपूर्ण देशात ग्राहकांना देणार मोफत इंटरनेट सेवा

स्मार्टफोन Buy लिंकवर क्लिक करताच वॉलमार्टची वेबसाइट उघडली, जिथं फोनची खरी किंमत दिसते. कंपनीनं चुकीनं स्मार्टफोनची किंमत 8 मिलियन लिहिलीय. आता ही चूक कंपनीनं दुरुस्त केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.