मुंबई : सोशल मीडियावर ट्विटवरचा दबदबा आहे. कमी शब्दात पोस्ट करण्याची मर्यादा आणि केलेली पोस्ट एडिट करता येत नव्हती. त्यामुळे विचार करुन पोस्ट करावी लागत होती. त्यामुळे एकादी चूक झाली तर पोस्ट काढू टाकावी लागत होती. आता तुम्हाला पोस्ट करताना एकादी चूक झाली तरी पोस्ट काढावी लागणार नाही. कारण ट्विट आता एडिट करता येऊ शकणार आहे.
दरम्यान, तसेच ट्विटरवर लाईव्ह व्हिडिओ करता येणार आहे. हा व्हिडिओ ३६० डिग्रीमध्ये करता येऊ शकतो. यामुळे ट्विटरने युजर वाढविण्यासाठी हे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.
१४० शब्दांची ट्विट करताना आहे. तरीही ट्विट करणे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. सोशल मीडियावर ट्विट केले की ते लगेच व्हायर होते. तसेच एकदा का ट्विट रिट्विट झाले तर ते काढणे शक्य नसते. तसेच एखादी चूक झाली तर दुरुस्त करता येत नव्हती. त्यामुळे चूक झाली तर मनस्ताप करावा लागयचा किंवा ती पोस्टच काढून टाकावी लागत होती. आता तुम्हाला तसे करण्याची गरज नाही. तुम्ही केलेले ट्विट दुरुस्त करता येणार आहे. तशी ट्विटरने नव्या वर्षात सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
Following in the footsteps of Brian Chesky: what's the most important thing you want to see Twitter improve or create in 2017? #Twitter2017
— jack (@jack) December 29, 2016
ट्विटर टाईमलाईनवर पोस्ट केलेले ट्विट आता तुम्हाला एडिट करता येणार आहे. याची माहिती ट्विटरचे सीईओ जॅक दोरसे यांनीच दिली आहे. नव्या २०१७ वर्षात ट्विटरवर यूजर्सना काय काय बदल अपेक्षीत आहेत, हे जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सीईओ जॅक दोरसे यांनी ट्विटरवर भविष्यातील सुधारणांची माहिती दिली.