नवी दिल्ली : आता मोटोरोला ही कंपनी मोटो बाय लेनोवो या नावाने ओळखली जाणार आहे. मोटोरोलाचे सीईओ रिक ऑस्ट्रेलोह यांनी या बातमीला दुजोरा दिलाय. लेनोवोने २०१४मध्ये मोटोरोलोला गुगलकडून खरेदी केले.
आतापर्यंत कंपनी मोटोरोलाच्या नावाने स्मार्टफोन बाजारात उतरवत होती. मात्र आता मोटो बाय लेनोवो असे नाव दिसणार आहे. तीन वर्षांपूर्वी मोटोरोलोला गुगलने १२.५ बिलियन डॉलरला खरेदी केले होते. आता गुगुलने मोटोरोला लेनोवोला २.९ बिलियन डॉलरला विकलीय.
लेनोवोच्या माहितीनुसार, कंपनीने मोटोरोलाला खरेदी केले असले तरी त्याचा ब्रँड संपणार नाही उलट त्याला अधिक मजबूती मिळेल.