मोटोरोलाच्या या ९ स्मार्टफोनमध्ये लवकरच मिळेल 'marshmallow'चं अपडेट

मोटोरोलानं आपल्या काही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडचं नवं वर्जन ६.० मार्शमॅलो अपडेट करण्याचं जाहीर केलंय. दुसऱ्या मोबाईल कंपन्या नवीन अँड्रॉइड अपडेटसाठी खूप वेळ घेतात. मात्र मोटोरोलाचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे.

Updated: Oct 5, 2015, 02:52 PM IST
मोटोरोलाच्या या ९ स्मार्टफोनमध्ये लवकरच मिळेल 'marshmallow'चं अपडेट title=

मुंबई: मोटोरोलानं आपल्या काही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडचं नवं वर्जन ६.० मार्शमॅलो अपडेट करण्याचं जाहीर केलंय. दुसऱ्या मोबाईल कंपन्या नवीन अँड्रॉइड अपडेटसाठी खूप वेळ घेतात. मात्र मोटोरोलाचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे.

भारतात मोटो एक्स प्ले लॉन्च होताच मोटोरोलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, मोटोरोला डिव्हाइसमध्ये सर्वात आधी मार्शमॅलो येईल. आता मोटोरोलानं आपल्या त्या स्मार्टफोन्सची लिस्ट जाहीर केलीय, ज्यात अँड्रॉइडचं मार्शमॅलो अपडेट मिळेल.

आणखी वाचा - लावानं लॉन्च केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 3G स्मार्टफोन

मोटोरोला इंडियानं ट्विटरवरून माहिती दिलीय की, भारतात मोटोरोलाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोटो एक्स स्टाइल काही दिवसांतच लॉन्च होईल. या फोनमध्ये हेक्साकोर प्रोसेसर सोबत ३जीबी रॅम दिला गेलाय. हा स्मार्टफोन OnePlus2 चांगलीच टक्कर देईल. 

पाहा कोणत्या स्मार्टफोन्समध्ये मिळेल मार्शमॅलो -

  • Moto X Style
  • Moto X Pure Editon
  • Moto X Play
  • Moto X (Gen 2)
  • Moto G (Gen 2)
  • Moto G (Gen 3)
  • Moto Turbo
  • Droid Turbo
  • Moto MAXX
  • Nexus 6 

 

आणखी वाचा - मोबाईल तापण्याची ३ महत्वाची कारणं आणि उपाय

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.