<B> <font color=#3333cc>चला इन्कम टॅक्स ऑफिसर होण्याची संधी!</font></b>

मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशननं योग्य उमेदवारांकडून इन्कम टॅक्स ऑफिसरच्या पोस्टसाठी अर्ज मागवले आहेत. २६३ जागांसाठी ही भरती होणार असून मध्य प्रदेश सरकारच्या विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ४ फेब्रुवारी २०१४ पूर्वी हे अर्ज पाठवायचे आहेत. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा घेतली जाणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 23, 2014, 01:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशननं योग्य उमेदवारांकडून इन्कम टॅक्स ऑफिसरच्या पोस्टसाठी अर्ज मागवले आहेत. २६३ जागांसाठी ही भरती होणार असून मध्य प्रदेश सरकारच्या विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी ४ फेब्रुवारी २०१४ पूर्वी हे अर्ज पाठवायचे आहेत. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा घेतली जाणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
> ऑनलाईन अर्ज सुरू - ५ जानेवारी २०१४
> ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची तारीख - ४ फेब्रुवारी २०१४
> अॅडमिशन कार्ड मिळण्याची टेन्टेटिव्ह तारीख - मार्च २१ - एप्रिल ११, २०१४
> परीक्षेची तारीख - १३ एप्रिल २०१४

निवड प्रक्रिया
> इच्छुक उमेदवाराला लेखी परीक्षा, शारीरीक क्षमता चाचणी आणि मुलाखत यातून जावं लागेल.
> जो उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण करेल तो पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरेल.
> त्यानंतर ठरवेलेल्या मापदंडानुसार शारीरीक चाचणी घेतली जाईल.
> अधिक माहितीसाठी सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईटवर संपर्क साधा.
अर्ज करण्याची पद्धत
> फी - अर्जाची फी रु. ९०/- एससी/एसटी/ओबीसी मध्य प्रदेशातले नागरिक आणि रु. १८०/- इतरांसाठी, सोबत रु. ४० पोर्टलचे चार्जेस.
> तुम्ही यासाठी ऑनलाईन फी भरू शकता कोणत्याही डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे.
> इच्छुक आणि पात्र उमेदवारानं ऑनलाईन अर्ज ४ फेब्रुवारी २०१४पूर्वी करावेत. त्यात आवश्यक माहिती भरण्यात यावी.
> फोटो आणि स्वाक्षरीचा फोटो दिलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करावेत.
> संपूर्ण अर्ज भरल्यानंतर त्याची फोटोकॉपी आपल्याजवळ भविष्यातील वापरासाठी ठेवावी.
अधिक माहितीसाठी पाहा - http://www.mppsc.nic.in/ लिंक