नीटचा परीक्षेचा निकाल जाहीर

वादग्रस्त ठरलेली वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीटचा निकाल आज संध्याकाळी जाहीर झाला. संपूर्ण देशात एकाच वेळी निकाल जाहीर झाला असून या निकालाच्या आधारावरच खासगी आणि अभिमत कॉलेजांचे प्रवेश होणार आहे. 

Updated: Aug 16, 2016, 10:59 PM IST
नीटचा परीक्षेचा निकाल जाहीर  title=

मुंबई : वादग्रस्त ठरलेली वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीटचा निकाल आज संध्याकाळी जाहीर झाला. संपूर्ण देशात एकाच वेळी निकाल जाहीर झाला असून या निकालाच्या आधारावरच खासगी आणि अभिमत कॉलेजांचे प्रवेश होणार आहे. 

देशातले 8 लाख 2 हजार 994 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यापैकी 4 लाख 9 हजार 477 विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. 

सीबीएसईकडून हा निकाल जाहीर झाला असून देशात पहिल्या दहामध्ये कोण विद्यार्थी आहेत याची माहितीही देण्यात आलीय. हेत शहा देशात पहिला आलाय तर एकांश गोयल याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर यावर आधारीत असलेली खासगी आणि अभिमत वैद्यकीय कॉलेजची प्रवेश प्रक्रीया ही 30 सप्टेंबरपर्यंत संपणार आहे.