मुंबई : घर हा तसा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येकाचच ते स्वप्न असतं आणि ते कसं असावं याची कित्येकदा स्वप्नेही पाहून झालेली असतात. घरासोबतच घरातील प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची असते. प्रत्येक गोष्ट परफेक्ट आणि मनाला हवी तशी टिकावू असावी यावर प्रत्येकाचा जोर असतो. त्यात घराचा रंगही आलाच. घर कसं असावं याचं प्लानिंग जेव्हा सुरू होतं तेव्हा घराचा बाहेरील, आतील रंग कसा असावा याचाही पुरेपुर विचार केला जातो. घराचा रंग हा फक्त दिसण्यापुरताच मर्यादीत नसतो तर योग्य आणि चांगल्या रंगामुळे तुमचं मनही प्रसन्न राहतं. इतकंच नाहीतर चांगला रंग तुमच्या घराचं उन, वारा, पाऊस, थंडी पासून रक्षणही करतं. या सर्वांपासून जर तुम्हालाही तुमच्या घराचं रक्षण करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे 'नेरोलॅक एक्सल पेंट' जो कोणत्याही वातावरणात दिसतो अगदी उत्तम...!
कोणत्याही वातावरणात नेरोलॅक एक्सल पेंट दिसे अगदी उत्तम
आपल्या स्वप्नातल्या घराला फक्त चांगला दिसणारा रंग देऊन चालणार नाहीतर तो घराचं उन, वारा, पावसापासून सुरक्षाही देतो. कारण ऊन, वारा आणि पावसामुळे घराच्या भिंती या खराब होतात. इतकेच नाहीतर रंगाची क्वालिटी चांगली नसली की, घरांच्या भिंतींचे पोपडेही पडायला लागतात. यामुळे आपल्या स्वप्नातील घराला गालबोट लागतं. आपलं नुकसान तर होतंच सोबतच घराचा चांगला लूकही बिघडतो. अशात नेरोलॅक एक्सल पेंट हाच आपल्या घरासाठी सर्वतोपरी फायद्याचा ठरू शकतो.
दर चार महिन्यांनी बदलणा-या ऋतुमध्ये ब-याचदा घरांच्या भिंती खराब होतात. कडक उन्हाचा मारा, त्यात जोरदार हवा साध्या कंपनीचे रंग पचवू शकत नाही आणि सुरूवातीला चमकदार भासणारे रंग नंतर फिके पडायला लागतात. याने तुमच्या घराचा ऐटदारपणाही जातो. इतकेच नाहीतर उन्हामुळे रंगांचा तजेलदारपणाही उडून जातो. त्यासोबत तुमची शानही जातेच. घराचा रंग हा घराची शान असला पाहिजे. त्यासाठी नेरोलॅक एक्सल पेंट तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
घरांची शोभा सर्वात जास्त कोणत्या ऋतूत जात असेल तर तो ॠतू म्हणजे पावसाळा. पावसाच्या मुसळधार सरी घराच्या भिंतींना खराब करतो. सततच्या पावसाने भिंतींना चिकटलेला रंग पोपडे होऊन खाली पडायला लागतो. घराची शोभा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाते. रंग हा तुमच्या समाजातील प्रतिष्ठेचंही प्रतिक असतो आणि तुमची ही प्रतिष्ठा तशीच टिकवून ठेवण्याचं काम नेरोलॅक एक्सल पेंट चांगल्याप्रकारे करतो.
घरांचां रंग हा समाजातील तुमची प्रतिष्ठा ठरवतो त्यामुळे घराच्या रंगाबाबत अजिबात तडजोड करता येत नाही. एकदा कुणी घराकडे बघितलं तर त्याला बघतच रहावं असं वाटलं पाहिजे. ही किमया कोणत्याही साध्या रंगात अजिबात नाही. नेरोलॅक एक्सल पेंट हा फक्त तुमच्या घराची शान वाढवत नाहीतर त्यासोबतच तुमची बचतही करतो. म्हणजे जर एकदा तुम्ही तुमचं घर नेरोलॅकने सजवलं तर तुम्हाला पुढील कित्येक वर्ष घराला रंग देण्याची गरज पडणार नाही, कारण नेरोलॅक एक्सलपेंटमध्ये आहे असाधारण टिकावूपणा. जो चाले वर्षानुवर्षे. दर दिवाळीला किंवा उत्सवाला तुम्ही घराला रंग देता. त्यामुळे दरवर्षी या महागाईतही रंगांचा खर्च वाढतो. पण नेरोलॅक जर तुम्ही तुमच्या घरांच्या भिंतीवर लावला तर तुमचा हा खर्च वाचेल. कोणताही साधा रंग घराला मारल्यानंतर वेगवेगळ्या ऋतूंमध्येते रंग वाचवण्यासाठी जो वेगळा खर्च तुम्ही करता तोही नेरोलॅक वाचवतो.
काही दिवसांनी चमकदार भिंती मळकट, धुळीने माखतात. पण नेरोलॅक पेंटमध्ये असे काही गुणधर्म आहेत ज्यामुळे तुमच्या भिंतींवर ना धूळ चिकटणार ना त्या भिंती धुळीने मळकट होणार. घराचा रंग हा फक्त घर चांगलं दिसावं म्हणून नसतो तर आपल्या डोळ्यांना आराम मिळावा यासाठीही असतो. नेरोलॅक एक्सल पेंटचे १४०० पेक्षा अधिक शेड्स तुम्ही बघू शकता. तुम्हाला आवडेल तो रंग तुम्ही निवडू शकता. या पेंटचे पॅकेजेस लीटरमध्ये असून ते बाजारात १ लीटर, ४ लीटर, १० लीटर आणि २० लीटर पॅकेजमध्ये उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी लिंक फॉलो करा