वॅाशिंग्टन: अमेरिकेतील 'द न्यूयॅार्क पोस्ट' आणि 'यूनाइटेड प्रेस इंटरनॅशनल' (यूपीआय) चं ट्विटर अकाऊंट हॅकर्सनी हॅक केलं आहे आणि त्यावरून ते आर्थिक तसंच सेनेशी संबंधित खोटी माहिती ट्विट करत आहेत.
'द न्यूयॅार्क पोस्ट' नं आपलं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचं सांगताच वॅाशिंग्टन मधील 'यूपीआय' चं ट्विटर अकाऊंट तसंच समाचार वेबसाइट दोन्ही हॅक झाल्याचं सांगितलंय.
'न्यूयॅार्क पोस्ट' मधील ट्विटर अकाऊंट मधून हॅकरनं खोटे ट्विट केले आहे की, दक्षिण चीन समुद्रात अमेरिका तसंच चीनच्या नौसेनेमध्ये युद्ध सुरू आहे.
तसंच 'यूपीआय' च्या ट्विटर अकाऊंटवरून एक सनसणीत खोटं ट्वीट केलं आहे की पोप फ्रांसिसनं घोषणा केली आहे की, 'तिसरं विश्वयुद्ध सूरू झालंय'. द न्यूयॅार्क पोस्ट तसंच यूपीआय ह्या हॅकर्सचा शोध घेत आहे
आठवड्याभरापूर्वी अमेरिकी सैन्याचं ट्विटर अकाऊंट हॅक केलं होतं. हॅकर्सनी स्वतःला इस्लामिक स्टेट (आईएस)चे असल्याचं सांगितलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.