www.24taas.com, विकास भदाणे, झी मीडिया, जळगांव
जागतिक मंदीचा फटका उद्योगांसोबतच महाविद्यालयांनाही बसतोय. जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला याचा नुकताच प्रत्यय आलाय.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नत २० महाविद्यालयातील ८० अभ्यासक्रम बंद करण्याचे प्रस्ताव विद्यापीठाकडे आले होते. त्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिलीय.
मात्र हे अभ्यासक्रम बंद करण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झालाय.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांना आता मुंबई किवा पुणे इथं जावं लागणार असल्याने त्यांनी खंत व्यक्त केलीय.
या अभ्यासक्रमांचा प्रचार प्रसार करण्यास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कमी पडतंय का? असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.