मुंबई : आज जगभरात हँकींग मोठ्या प्रमाणात होत चालली आहे. कोणी काहीही कधीही हॅक करु शकतं. मग ते मेल असो, फोन असो किंवा तुमचा हेडफोनही. हेडफोन कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आता हेडफोन देखील हॅक होऊ शकतात.
एक परराष्ट्रातील न्यूज एजेंसी वायर्डने दिलेल्या माहितीनुसार इज्राईलच्या रिसर्च करणाऱ्यांनी हेडफोन हॅकिंगचा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे. मेलवेयर सॉफ्टवेअरच्या मदतीने हेडफोन मायक्रोफोनमध्ये बदलून तुमचं बोलणं रेकॉर्ड केलं जाऊ शकतं.
इज्राईलच्या बेन ग्यूरियोन यूनिवर्सिटीच्या रिसर्च करणाऱ्यांनी एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट तयार केला आहे. यामध्ये सांगितलं गेलं आहे की, कशा प्रकारे हॅकर्स तुमचा ऑडियो रेकॉर्ड करुन तुमचं बोलणं हेडफोनच्या माध्यमातून रेकॉर्ड करु शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमचा हेडफोन कंप्यूटरला कनेक्ट नसला तरी किंवा डिसेबल केला गेला असला तरी तो हॅक होऊ शकतो.