अवघ्या २५ हजार रुपयांत आयफोन ५ एस

अॅपलने भारतात आपल्या बेस्ट सेलर आयफोन ५एसची किंमत तब्बल दुपटीने कमी केलीय. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा किंमती कमी करण्यात आल्यात. दिवाळीनंतर ६एस आणि ६एस प्लसची मागणी घटली. त्यामुळे आयफोनची विक्री वाढण्यासाठी कंपनीने किंमत कमी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Dec 14, 2015, 02:15 PM IST
 अवघ्या २५ हजार रुपयांत आयफोन ५ एस title=

नवी दिल्ली : अॅपलने भारतात आपल्या बेस्ट सेलर आयफोन ५एसची किंमत तब्बल दुपटीने कमी केलीय. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा किंमती कमी करण्यात आल्यात. दिवाळीनंतर ६एस आणि ६एस प्लसची मागणी घटली. त्यामुळे आयफोनची विक्री वाढण्यासाठी कंपनीने किंमत कमी करण्याचा निर्णय घेतलाय. 

सप्टेंबरमध्ये आयफोन ५ एसची किंमत ४४ हजार ५०० रुपये होती. ती आता २४ हजार ९९९ रुपये इतकी करण्यात आलीये. यापूर्वी दसऱ्यामध्ये आयफोन५एसची किंमत कमी कऱण्यात आली होती. त्यानंतर पु्न्हा दिवाळीआधी किंमती कमी करण्यात आल्या. 

आयफोन ६एस आणि ६एस प्लसची विक्री दिवाळीमध्ये काही काळानंतर कमी झाली. यामुळे अॅपलने आयफोन ५एसच्या किंमती आणखी कमी केल्यात. त्यामुळे आता तुम्हीही स्मार्टफोन खरेदी करु शकता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.