'बकरी ईद'च्या निमित्तानं बकऱ्यांचीही ऑनलाईन खरेदी!

बकरी ईदच्या मुहूर्तावर कुर्बानी देण्यासाठी बकरा खरेदी करण्यासाठी आता खरेदीदारांना बाजारात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण घरबसल्या केवळ एका क्लिकवर आता ऑनलाईन बकऱ्यांचीही खरेदी करता येणार आहे.

Updated: Sep 16, 2015, 05:37 PM IST
'बकरी ईद'च्या निमित्तानं बकऱ्यांचीही ऑनलाईन खरेदी! title=

नवी दिल्ली : बकरी ईदच्या मुहूर्तावर कुर्बानी देण्यासाठी बकरा खरेदी करण्यासाठी आता खरेदीदारांना बाजारात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण घरबसल्या केवळ एका क्लिकवर आता ऑनलाईन बकऱ्यांचीही खरेदी करता येणार आहे.

आत्तापर्यंत ओएलएक्स, क्विकर यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर तुम्ही फोन, गाडी, फर्निचरसारख्या सामानाची खरेदी केली असेल. पण, आता या निर्जीव वस्तूंसोबतच जिवंत बकऱ्यांचीही खरेदी या माध्यमातून होताना दिसतेय. या वेबसाईटसवर वेगवेगळ्या जातींचे आणि वेगवेगळ्या किंमतींचे बकरे सध्या मिळताना दिसत आहेत. यामध्ये, मेवाती, देसी, बरबरा, तोतापरी यांसारख्या बकऱ्याच्या जातींचाही समावेश आहे.

या साईटसवर सहा हजारांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे बकरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांच्या मालकांना दिलेल्या संपर्क क्रमांकावरून संपर्क करू शकता... आणि बकरे खरेदी करता येणार आहेत. 

ईद-उल-अजहा (बकरी ईद) च्या निमित्तानं मुस्लिम समुदायाचे लोक बकरे आणि इतर पशुंची कुर्बानी देतात. हा सण यंदा २५ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.