फ्लिपकार्टचा ऑनलाईन खरेदीसाठी 'बिग बिलियन डे' अॅप सेल!

सध्या ऑनलाईन खरेदीवर भर दिसून येत आहे. ऑनलाईनचे मार्केट वाढत आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन त्यांना अधिक आकर्षक करुन आपल्या उत्पादनाचा खप वाढविण्यासाठी ऑनलाईन विक्रेत्या वेबसाईट सेलचा आधार घेत आहेत. आघाडीवर असणारी फ्लिपकार्टने 'बिग बिलियन डे' अॅप सेल लावलाय.

Updated: Oct 1, 2015, 09:02 PM IST
फ्लिपकार्टचा ऑनलाईन खरेदीसाठी 'बिग बिलियन डे' अॅप सेल! title=

मुंबई : सध्या ऑनलाईन खरेदीवर भर दिसून येत आहे. ऑनलाईनचे मार्केट वाढत आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन त्यांना अधिक आकर्षक करुन आपल्या उत्पादनाचा खप वाढविण्यासाठी ऑनलाईन विक्रेत्या वेबसाईट सेलचा आधार घेत आहेत. आघाडीवर असणारी फ्लिपकार्टने 'बिग बिलियन डे' अॅप सेल लावलाय.

हा सेल दसऱ्याच्या निमित्ताने लावण्यात आलाय. १३ ऑक्टोबरपासून  फ्लिपकार्टचा बिग बिलियन सेल सुरू होत आहे. ऑलाईन शॉपिंग खरेदी करणाऱ्यांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. हा सेल १३ ऑक्टोबरपासून ते १७ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान, या सेलमध्ये सहभागी व्हायचे असेल किंवा खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल अॅप असणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही ते अॅप तुम्ही ऑनलाईन जाऊन डाऊनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईनचा आनंद लुटता येणार आहे.

या सेलमध्ये सुट आहे. घड्याळांवर ५०%, स्वयंपाकघरातील वस्तूंमध्ये २०% सवलत देण्यात आली आहे. घरगुती वापराच्या वस्तूंबरोबरच टेक्नॉलॉजीच्या वस्तूही कमी दरात खरेदी करता येणार आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.