ओपो N1 मिनी येणार भारतीय बाजारात

चीनची स्मार्टफोन कंपनी ओपो लवकरच भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन N1 मिनी लवकर लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा फोन पहिल्या ओपो फोनचे कॉम्पॅक्ट व्हर्जन आहे. N1 प्रमाणेच या स्मार्टफोनमध्ये रोटेटरी कॅमेरा आहे. हा फोन या महिन्याच्या शेवटी भारतात लॉन्च करण्याचा कंपनीचा विचार आहे. कंपनीच्या ऑफीशअल फेसबूक आणि ट्विटर पेजवर या फोनचे फोटो पोस्ट केले आहेत. 

Updated: Aug 7, 2014, 11:22 AM IST
 ओपो N1 मिनी येणार भारतीय बाजारात title=

मुंबई : चीनची स्मार्टफोन कंपनी ओपो लवकरच भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन N1 मिनी लवकर लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा फोन पहिल्या ओपो फोनचे कॉम्पॅक्ट व्हर्जन आहे. N1 प्रमाणेच या स्मार्टफोनमध्ये रोटेटरी कॅमेरा आहे. हा फोन या महिन्याच्या शेवटी भारतात लॉन्च करण्याचा कंपनीचा विचार आहे. कंपनीच्या ऑफीशअल फेसबूक आणि ट्विटर पेजवर या फोनचे फोटो पोस्ट केले आहेत. 

कंपनीने हा फोन या वर्षी जूनमध्ये चीनमध्ये केला. याची किंमत  2699 यॉन आहे. त्यामुळे भारतात याची किंमत सुमारे 26,600 रुपये असू शकते. 

फीचर्सच्या बाबतीत हा फ़ोन जबरदस्त आहे. या फोनमध्ये साइऐजन ऑपरेटिंग सिस्टम आहे. जी 4.3 एन्ड्रॉइडवर चालते, त्याला साइऐजन इंकने डेव्हलप करून तयार केले आहे. तसेच 5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, याचा पिक्सल रिझ्युल्यूशन 720x1280p आहे आणि डेन्सिटी 377ppi पिक्सल आहे. प्रोसेसरमध्ये हा फोन बेस्ट आहे. ओपो एन1 मिनी मध्ये 1.6 क्वार्ड 400 स्नैपड्रैगन प्रोसेसर आहे,  मेमरीबाबत बोलायचे तरह या फोनमध्ये 2GB रॅम 16GB आणि 32GB इंटरनल मेमरी आहे. दरम्यान, कंपनीने आता 32GB मेमरीच्या मॉडेलचे किंमत अजून जाहीर केलेली नाही.
 
कॅमराबाबत बोलायचे तर फोन खूप चांगला आहे. यात 13 मेगापिक्सल कॅमरा आहे, यात एलईडी फ्लॅश आहे. यात कैमरा 206 डिग्रीच्या एँगलवर रोटेट होऊ शकतो, आणि या एँगल लॉकही करता येते. रोटेशनच्या या फिचरमुळे या फोनला सर्वात वेगळे मानले जात आहे. 
स्मार्टफोन यूजर्ससाठी ओपो एन1 मिनी एक जबरदस्त पर्याय आहे. बॅटरी 3,610mAh ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शंसमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 4.0, एनएफसी आणि डीएलएनए समाविष्ट आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.