गाडी चालवताना मोबाईलवर बोलाल तर १० हजारांचा दंड

अनेक वेळा मान वाकडी करून मोबाईलवर बोलणे सुरु असते. त्याचवेळी गाडीही चालविली जाते. मात्र, याला आता चांगलाच चाप बसणार आहे. गाडी चालवताना मोबईलवर बोलताना जो कोणी सापडेल त्याला तब्बल १० हजार रुपयांचा दणदणीत दंड बसणार आहे. एवढ्यावरच नाही तर पुन्हा लर्निंग लायन्सेस काढावे लागेल.

Updated: Dec 9, 2014, 06:18 PM IST

नवी दिल्ली : अनेक वेळा मान वाकडी करून मोबाईलवर बोलणे सुरु असते. त्याचवेळी गाडीही चालविली जाते. मात्र, याला आता चांगलाच चाप बसणार आहे. गाडी चालवताना मोबईलवर बोलताना जो कोणी सापडेल त्याला तब्बल १० हजार रुपयांचा दणदणीत दंड बसणार आहे. एवढ्यावरच नाही तर पुन्हा लर्निंग लायन्सेस काढावे लागेल.

कायद्यानुसार गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्यास बंदी आहे. केवळ १०० ते ३०० रुपयांची पावती फाडून वाहनचालक आपली सुटका करून घेत होता. आता तसे करता येणार नाही. कारण मोबाईलवरील बोलणे मात्र चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. दहा हजारांचा दंड भरावा लागेल. शिवाय लायसन्स रद्द होऊन पुन्हा सक्तीचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

केंद्रातील मोदी सरकारने ‘अपघात रोको’ विधेयक तयार केले आहे.  त्यात ही तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकाला पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याचे शक्यता आहे. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनातच हे विधेयक मांडण्यात येणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कारवाईला सुरुवात होणार आहे.

> अशी असणार शिक्षा
वाहन चालवताना चालक मोबाईलवर बोलताना सापडला तर नवे विधेयक मंजूर झाल्यानंतर या गुन्ह्यासाठी पहिल्यांदा चार हजार, दुसर्‍यांदा सहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तोच वाहनचालक तिसर्‍यांदा मोबाईलवर बोलताना सापडला तर १० हजार रुपयांचा दंड आकारतानाच त्याचे लायसन्स महिनाभरासाठी निलंबित करण्यात येईल. तसेच त्याला नियमानुसार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी धाडले जाईल.

> काय असणार या विधेयकात?
- दर पाच वर्षांनी वाहनांची तपासणी सक्तीची
-  ही तपासणी देशभरात कुठेही करून घेता येईल.
- वाहनाची नोंदणी केलेल्या राज्यात वाहन घेऊन जाण्याची गरज नाही.
- मद्यपान करून वाहन चालवताना चालक आढळला तर त्यांच्यावर १० हजार रुपयांचा दंड;
- लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित होणार.
- सध्या शिक्षेत होणार वाढ तरतूद आहे.
- चालकाने ‘सीट बेल्ट’न वापरल्यास पाच हजार रुपये दंड
- वाहनाच्या धडकेत बालक मृत्यू झाल्यास तीन लाख रुपये दंडाबरोबरच सात वर्षांचा तुरुंगवास
- बालकाला मांडीवर घेऊन स्टिअरिंग त्याच्या हाती दिले तरीही शिक्षा. १५ हजारांसह १५ दिवसांचा तुरुंगवास
- रस्ते वाहतूक लायक नसल्यास कन्स्ट्रक्शन कंपनीवर खटल्याचा नागरिकाला अधिकार
- विमा संरक्षण सक्तीने पुरवण्यासाठी ‘मोटार अपघात निधी’ उभारणार.
- आरटीओमधील अधिकार्‍यांचे विशेषाधिकार मोडीत काढणार.
- पासपोर्टप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रिया ऑनलाइन

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.