नवी दिल्ली : चेतन भगत यांची नवी कादंबरी 'हाफ गर्लफ्रेन्ड' प्रकाशित झाल्यानंतर, काही दिवसांतच सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीकाकारांनी हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.
हे इंग्रजीत लिहिण्यात आलेले 'हिंदी पुस्तक' असल्याची टीका सध्या होत आहे. विशेष म्हणजे पुस्तकातील भाषेवरूनही सोशल मिडियावर अत्यंत वाईट पद्धतीने टर उडवली जात आहे. त्यातही नॉव्हेलमध्ये वापरण्यात आलेल्या 'देती है तो दे वरना कट ले' या हिंदी वाक्यावरही मोठ्या प्रमाणात टिका होतेय.
हे नॉव्हेल चेतन भगत यांनी १ ऑक्टोबरला लाँच केले होते. या पुस्तकावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणार याचा अंदाजही भगत यांना आधीपासूनच होता.
चेतन यांनी पुस्तक लाँचिंगच्या एक दिवस आधी टवी्ट केले होते की, ''एकच दिवस शिल्लक आहे. आता टीकाकारांसाठी चांगली वेळ येणार आहे." या ट्वीटद्वारे चेतन यांनी टीकाकारांना सौम्य पद्धतीने टीका करण्याचे आवाहन केले होते.
भारतात होणाऱ्या शब्दाचा वापर?
'हाफ गर्लफ्रेंड' चा हिरो बिहारचा एक तरुण आहे. तो देशातील सर्वात मोठ्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. पण त्याला इंग्रजी येत नसते. त्याच कॉलेजमधील एका मुलीवर त्याचे प्रेम जडते.
तिला चांगली इंग्रजी येत असते. कादंबरीत वापरण्यात आलेल्या इंग्रजी भाषेबाबत चेतन सांगतात की, त्यांनी हिरोसाठी ज्या इंग्रजी भाषेचा वापर केला आहे, तशा भाषेचा वापर हा भारतात केला जातो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.