निवडणुकीमुळे बारावीचे पुढे ढकलले दोन पेपर

राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीमुळे बारावीचे दोन पेपर पुढे ढकलावे लागले आहेत. 15 ऑक्टोबरला होणारे पेपर 20 ऑक्टोबरला होणार आहेत.

Updated: Sep 17, 2014, 04:42 PM IST
निवडणुकीमुळे बारावीचे पुढे ढकलले दोन पेपर

मुंबई : राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीमुळे ऑक्टोबरमधील बारावीचे दोन पेपर पुढे ढकलावे लागले आहेत. 15 ऑक्टोबरला होणारे पेपर 20 ऑक्टोबरला होणार आहेत.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या ऑक्टोबरमधील शिक्षणशास्त्र आणि इंग्रजी साहित्य या दोन विषयांच्या परीक्षा 15 ऐवजी 20 ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले आहे. वेळापत्रकात अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे मंडळातर्फे सांगण्यात आलेय.

बारावीची ही परीक्षा 26 सप्टेंब्र ते 18 ऑक्टोबर या काळात होत आहे. वेळापत्रक याआधीच ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने विधानसभेचे मतदान 15 ऑक्टोबरला घेण्याचे जाहीर केल्यामुळे दोन विषयांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्याचे सांगण्यात आले आहे.

शिक्षणशास्त्र विषयाची परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजता तर इंग्रजी साहित्य विषयाची परीक्षा दुपारी 2.30 ते 5.30 वाजता होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.