नवी दिल्ली : नवनव्या तंत्रज्ञानामुळे जग डिजीटल होत चाललंय. सोशल मीडियावरील वाढता वावर हे त्याचेच उदाहरण. मात्र याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक चुकीच्या गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर वाढत चाललाय. अलीकडे व्हॉट्सअॅप, ट्विटर या सोशल साईटच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय तेजीत सुरु आहे.
वेश्याव्यवसायासंबंधित लोकही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करु लागलेत. व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर त्यांचा वावर वाढू लागलाय. एस्कॉर्ट एजंसीही याचा मोठ्या प्रमाणात फायदा उचलतायत.
दरदिवशी बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर वेश्याव्यवसायातही होऊ लागला. व्हॉट्सअॅप सारख्या सोशल अॅपच्या सहाय्याने या व्यवसायातील एजंटांचे काम सुलभ झालेय. यामुळे सार्वजनिक ठिकाणी मीटिंग करणे तसेच मुलींची निवड सोपी झाल्याचा दावा एजंट करतायत. आता फोनकॉल ऐवजी व्हॉट्सअॅपद्वारे व्यवसायाशी संबंधित चर्चा केल्या जातात. कारण अशा प्रकारचा संवाद सुरक्षित असतो असे या एजंटचे म्हणणे आहे.
व्हॉट्सअॅपसोबत वेबसाईटवरही या व्यवसायाचे प्रमोशन केले जाते. या वेबसाईटवर त्यांची सर्व्हिस आणि संपर्कासाठी नंबर दिलेला असतो. गुगल सर्चदरम्यान याप्रकारच्या अनेक वेबसाईटची माहिती सहजरित्या मिळू शकते. तसेच एखाद्या उच्चभ्रू वस्तीतूनच वेबसाईटचे काम चालते. यासोबतच ट्विटरचाही वापर केला जातो. ट्विटरद्वारे या एजन्सीज त्यांची सर्व्हिस आणि नव्या मुलींबाबतची माहिती शेअर केली जाते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.