बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, निकाल वेळेत लागणार

बारावीचा निकाल वेळेवर लागणार हे आता निश्चित झालं आहे. पेपर तपासणीवर शिक्षक महासंघानं टाकलेला बहिष्कार मागे घेतलाय.

Updated: Mar 16, 2017, 04:22 PM IST
बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, निकाल वेळेत लागणार  title=

मुंबई : बारावीचा निकाल वेळेवर लागणार हे आता निश्चित झालं आहे. पेपर तपासणीवर शिक्षक महासंघानं टाकलेला बहिष्कार मागे घेतलाय. शिक्षणमंत्री विनोद तावडेंसोबत झालेल्या बैठकीनंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आलीय.

आजपासून 72 हजार प्राध्यापक पेपर तपासायला सुरुवात करणार असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिलीय. महासंघानं असहकार आंदोलन मागं घेतल्यामुळं बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय.