पॅनकार्डचा गैरवापर तुम्हाला महाग पडू शकतो...

हल्ली अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून पॅनकार्डचा वापार केला जातो. आर्थिक देवाण-घेवाणीमध्येही सध्या पॅनकार्ड अनिवार्य आहे. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का पॅननंबरचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर तुम्हाला तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते. 

Updated: Nov 29, 2015, 10:21 AM IST
पॅनकार्डचा गैरवापर तुम्हाला महाग पडू शकतो... title=

नवी दिल्ली : हल्ली अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून पॅनकार्डचा वापार केला जातो. आर्थिक देवाण-घेवाणीमध्येही सध्या पॅनकार्ड अनिवार्य आहे. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का पॅननंबरचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर तुम्हाला तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते. 

इनकम टॅक्स कायद्यानुसार निश्चित रकमेपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी पॅनकार्ड गरजेचे असते. यावेळी अनेकदा काही लोक पॅनकार्डचा वापर करत नाहीत अथवा चुकीचा पॅननंबर देतात. मात्र टॅक्स असेसमेंटच्या वेळेस इनकम टॅक्स विभागाची नजर तुमच्यावर पटू शकते.

इनकम टॅक्स कायद्यानुसार कोणताही व्यक्ती पॅनकार्डशी संबंधित चुकीची माहिती देत असेल तर त्याला २० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसेच काही प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. 

पाच लाखांपेक्षा अधिकची प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी पॅन नंबर आवश्यक असतो. याशिवाय तुम्ही पाच लाखांहून अधिक रकमेची ज्वेलरी खरेदी करताय तेव्हादेखील तुम्हाला टॅक्स डिपार्टमेंटला पॅन नंबरच्या सहाय्याने सूचना देणे गरजेचे असते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.