LEAKED: सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड 3 चे फीचर्स झाले लीक

 सॅमसंगच्या स्मार्टफोन्ससाठी वेडे होणाऱ्या खुशखबर... सॅमसंगचा स्मार्टफोन गॅलेक्सी ग्रँड ३चे स्पेशिफिकेशन ऑनलाइन डाटाबेस कंपनी जीएफएक्स बेंचमार्कवर लीक झाले आहेत.

Updated: Nov 5, 2014, 03:47 PM IST
LEAKED: सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड 3 चे फीचर्स झाले लीक title=

मुंबई : सॅमसंगच्या स्मार्टफोन्ससाठी वेडे होणाऱ्या खुशखबर... सॅमसंगचा स्मार्टफोन गॅलेक्सी ग्रँड ३चे स्पेशिफिकेशन ऑनलाइन डाटाबेस कंपनी जीएफएक्स बेंचमार्कवर लीक झाले आहेत.

काय आहे खास गॅलेक्सी ग्रँड ३ मध्ये

मिळालेल्या माहितीनुसार गॅलक्सी ग्रँड ३ मध्ये ५.५ इंचाचा स्क्रिन आहे. याच्या तुलनेत सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड २मध्ये ५.२ इंचाची स्क्रीन होती. गॅलेकक्सी ग्रँड ३ मध्ये 1.2GHz क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 410 क्वॉडकोर, 64 बिट प्रोसेसर आहे.

हा स्मार्टफोन 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम सपोर्टिव आहे. या  प्रोसेसरसह नुकताच HTCने एचटीसी डिज़ायर 510 स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

 

याशिवाय गॅलेक्सी ग्रँड 3 मध्ये एड्रेनो 306 ग्राफिक्स प्रोसेसरही आहे. सॅमसंगच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये तुम्हांला ग्राफिक्सचा शानदार अनुभव मिळले. गॅलेक्सी ग्रँड 3 मध्ये 1.5GB रॅम आहे. तसेच हा  स्मार्टफोन स्टोरेज़साठी खूप चांगला आहे. गॅलेक्सी ग्रँड 3 मध्ये 16GB आणि 12GB इंटरनल स्टोरेज़सह दोन ऑप्शन आहेत.

 

गॅलेक्सी ग्रँड 3 चा कॅमराही गॅलेक्सी ग्रँड 2 च्या तुलनेत खूप चांगला आहे. गॅलेक्सी ग्रँड 2 मध्ये 8 मेगापिक्सल रिअरचा कॅमरा होता तो गॅलेक्सी ग्रँड 3 मध्ये 13 मेगापिक्सल का रिअरचा कॅमरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा आहे. या तुलनेत गॅलेक्सी ग्रँड 2 मध्ये 1.9 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.