कमी बजेटमध्ये बसणारा सॅमसंगचा 4जी स्मार्टफोन आला

हल्ली स्वस्त आणि चांगले फीचर्स असलेल्या स्मार्टफोनची चलती आहे. स्वस्तातील स्मार्टफोन्सची वाढती मागणी पाहता सॅमसंगनेही अत्याधुनिक फीचर्सनी युक्त नवा 4 जी स्मार्टफोन लाँच केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला सॅमसंगचा 4जी 'गॅलॅक्सी जे3' अखेर लाँच झाला आहे. या स्मार्टफोनला सॅमसंगने चायना वेबसाइटवर लिस्ट केला आहे. 

Updated: Nov 21, 2015, 12:04 PM IST
कमी बजेटमध्ये बसणारा सॅमसंगचा 4जी स्मार्टफोन आला  title=

नवी दिल्ली : हल्ली स्वस्त आणि चांगले फीचर्स असलेल्या स्मार्टफोनची चलती आहे. स्वस्तातील स्मार्टफोन्सची वाढती मागणी पाहता सॅमसंगनेही अत्याधुनिक फीचर्सनी युक्त नवा 4 जी स्मार्टफोन लाँच केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला सॅमसंगचा 4जी 'गॅलॅक्सी जे3' अखेर लाँच झाला आहे. या स्मार्टफोनला सॅमसंगने चायना वेबसाइटवर लिस्ट केला आहे. 

हे आहेत 'गॅलक्सी जे3' चे फीचर्स

5.5 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले 
रिझोल्यूशन 720×1280 पिक्सल
1.5 गिगाहर्टझ क्वाडकोर प्रोसेसर
1.5 जीबी रॅम
8 जीबी इंटरनल मेमरी, 128 जीबीपर्यंत वाढवण्याची क्षमता
अँड्रॉईड 5.128
8 मेगापिक्सल रेयर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
4जी, 3जी, ब्लूटूथ, वायफाय, एनएफसी

या स्मार्टफोनची किंमत कंपनीने जाहीर केलेली नाही. मात्र त्याचे फीचर्स पाहता हा स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत असेल अशी शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.