पाण्यात पोहणाऱ्या माशांना दूध पितांना पाहिलं का....

 पाण्यातील मासे हे सस्तन प्राणी नसतात, पण माणूस काय करू शकतो आणि प्राण्यांना आपल्या सवयी कशा लावू शकतो याचं जीवंत उदाहरण या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

Updated: Apr 29, 2016, 04:13 PM IST

मुंबई :  पाण्यातील मासे हे सस्तन प्राणी नसतात, पण माणूस काय करू शकतो आणि प्राण्यांना आपल्या सवयी कशा लावू शकतो याचं जीवंत उदाहरण या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

थायलंडमधील पटाया येथील एका फ्लोटिंग मार्केटमध्ये माशांना दूध पाजले जात आहे. यासाठी पैसे घेऊन लहान मुलांना ज्या बाटलीने दूध पाजण्यात येते त्या बाटलीद्वारे हे दूध पाजले जात आहे. 

लोकांना हे अद्भूत चित्र पाहून खूप अप्रूप वाटत आहे.