खुशखबर! एका रुपयांत मिळतोय स्मार्टफोन

हा स्मार्टफोन अवघ्या एक रुपयांत मिळतोय. तुम्ही म्हणालं कस शक्य आहे? मात्र हो हे खरं आहे. स्मार्टफोन कंपनीने मेजूने अवघ्या एक रुपयांत मेजू एम२ ची विक्रीची घोषणा केलीय. 

Updated: Dec 17, 2015, 02:14 PM IST
खुशखबर! एका रुपयांत मिळतोय स्मार्टफोन title=

नवी दिल्ली : हा स्मार्टफोन अवघ्या एक रुपयांत मिळतोय. तुम्ही म्हणालं कस शक्य आहे? मात्र हो हे खरं आहे. स्मार्टफोन कंपनीने मेजूने अवघ्या एक रुपयांत मेजू एम२ ची विक्रीची घोषणा केलीय. 

या कंपनीने आपल्या खरेदीदारांसाठी नवी स्पर्धा आयोजित केलीय. या स्पर्धेंतर्गत एका रुपयांत तुम्ही स्मार्टफोन जिंकू शकता. ही स्पर्धा २१ डिसेंबरपर्यंत असणार आहे. #m2for1 या नावाने ही स्पर्धा सुरु करण्यात आलीय. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. 

आणखी वाचा - व्हॉटसअपमध्ये दडलेल्या या सहा ट्रिक्स! तुम्हाला माहीत आहेत का?

तुम्हाला केवळ मेजूचा लोगो फोनवर कुठे दाखवला गेला पाहिजे याबाबत आयडिया द्यायची आहे. ही आयडिया तुम्ही #m2for1 सोबत शेअर करु शकता. 

आणखी वाचा - अवघ्या २५ हजार रुपयांत आयफोन ५ एस

मेजू एम२मध्ये पाच इंचाचा डिस्प्ले, १.३ गिगाहर्टझ क्वाडकोर मीडियाटेक प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. तसेच १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. याची मूळ किंमत सहा हजार ९९९ रुपये आहे