www.24taas.com, झी मीडिया, मेघालय
लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन असे म्हंटले. मात्र भारतातील काहीबाबत याच लग्नाबाबत विचित्र पद्धत अस्तिवात आहे.
जावई आणि सासूमधील नाते मुलगा आणि आई पेक्षा कमी नसते. परंतु मेघालयातील गारो जमातीत एक विचित्र परंपरा आहे. गारो जमातीत मुलगी आणि तिच्या आईचा एकच पती असू शकतो. म्हणजे जावई त्याच्या सासूसोबत विवाहबद्ध होऊ शकतो.
मेघालयातील गारो जमातीचे महाभारतातील अर्जुनसोबतही एक विशिष्ट प्रकारचे नाते होते. मेघालयातील गारो जमातीत परंपरेनुसार जावई आणि सासू लग्न करू शकतात. लग्न झाल्यानंतर त्यांच्यातील जावई आणि सासूचे नाते संपुष्ठात येऊन पती-पत्नीचे नाते बनून जाते.
मेघालयाती गारो जमाती संस्कृती आणि लोकपरंपरेने समृद्ध आहे. म्हशीची शिंगे, बासरी आणि मृदंगाच्या निनादात नृत्य आणि मदिरापान करण्याची यांच्या प्राचिन परंपरा आहे. आपल्या कुळगोत्राच्या बाहेर याचे विवाह जुळतात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.