16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला फोन 25 जुलैला होणार लॉन्च

सोनीचा एक्सपीरिया XA Ultra 25 जुलैला भारतामध्ये लॉन्च होणार आहे.

Updated: Jul 22, 2016, 10:07 PM IST
16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला फोन 25 जुलैला होणार लॉन्च title=

मुंबई : सोनीचा एक्सपीरिया XA Ultra 25 जुलैला भारतामध्ये लॉन्च होणार आहे. तब्बल 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा तर 21.5 मेगापिक्सलचा कॅमेरा या फोनला आहे. 

सोनी एक्सपीरिया XA Ultra फोनला 6 इंचांची स्क्रीन आहे. या स्क्रीनचं रिझोल्यूशन 1080x1920 पिक्सल्स एवढं आहे. या फोनमध्ये MediaTek MT6755 चा ऑक्टा-प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 3 GB रॅम, 16 GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं 200 GB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची क्षमता या फोनमध्ये देण्यात आली आहे. 

190 ग्रॅम वजन असलेल्या या स्मार्टफोनमध्ये अॅन्ड्रॉईड 6.0 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. या स्मार्टफोनला 4G सपोर्ट देण्यात आला आहे.