दहावीचा कलमापन चाचणीचा निकाल जाहीर

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्याच्या कलमापन चाचणीचा निकाल जाहीर झालाय. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. 

Updated: Apr 25, 2016, 02:17 PM IST
दहावीचा कलमापन चाचणीचा निकाल जाहीर title=

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दुपारी १ वाजता कलमापन चाचणीचा ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. 

www.ivgs.ac.in या संकेत स्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. दुपारी एक पासून कलमापन चाचणीचा निकाल पाहता येईल.

दहावीच्या विद्यार्थ्याच्या कलमापन चाचणीचा निकाल सोमवारी देण्यात येईल. विद्यार्थ्यांना पुढील क्षेत्र निवडण्यासाठी या कलमापन चाचणीतून मार्गदर्शन करण्याचा राज्य शासनाचा हा महत्वपूर्ण उपक्रम आहे.