www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळातील वास्तव्यानंतर प्रथमच भारतात दाखल झाली आहे. दिल्लीत सुनीताचे स्वागत करण्यात आले. यावेळी तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुनीता भारत भ्रमण करणार आहे.
सुनीता अमेरिकी नौदलात कॅप्टन पदावर कार्यरत आहे. तीने प्रथम दिल्ली येथील नॅशनल सायन्स सेंटरला भेट दिली. तेथील विद्यार्थ्यी तसेच शिक्षकांशी तीने संवाद साधला. तसेच या भेटीच्यावेळी ४ एप्रिलला मुंबईत येणार आहे. येशील नेहरू सायन्स सेंटरला भेट देणार आहे.
या दौऱ्याच्या अखेरीस ती गुजरातमधील आपल्या नातेवाईकांची भेट घेणार आहे. गुजरातमधील आपल्या नातलगांना भेटण्याची सुनीताची प्रदीर्घ इच्छा या दौऱ्या दरम्यान पूर्ण होणार आहे. सुनीताचे वडील गुजरातमधील महेसणा जिल्ह्याचे रहिवासी आहेत.