हे गवत डासांना पळवून लावतं

अमेरिकन शास्त्रज्ञांनी स्वीटग्रासमधील असं रसायन शोधून काढलं आहे, ज्यामुळे मच्छर पळ काढतात.

Updated: Sep 7, 2015, 06:52 PM IST
हे गवत डासांना पळवून लावतं title=

न्यूयॉर्क : अमेरिकन शास्त्रज्ञांनी स्वीटग्रासमधील असं रसायन शोधून काढलं आहे, ज्यामुळे मच्छर पळ काढतात.

अमेरिकेतले मूळनिवासी या गवताचा वापर परंपरागत पद्धतीने मच्छर पळवण्यासाठी करतात.

शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत स्वीट ग्रासचा वापर केला तेव्हा त्यांच्यावर डासांवर हा प्रयोग एखाद्या किटक नाशकासारखा झाला.

मात्र या गवताचा परिणाम किती तासांपर्यंत राहतो, याचा प्रयोग अजून करून पाहण्यात आलेला नाही.

शास्त्रज्ञांच्या मते पारंपरिक पद्धतीने मच्छर पळवण्याचं परिणामकारक रसायन तयार होऊ शकतं.

अमेरिकन कृषी मंत्रालयमध्ये काम करणाऱ्या रिसर्च केमिस्ट चार्ल्स कँट्रेल म्हणतात, हे चौथ्या प्रकारचं गवत आहे, ज्यावर आम्ही प्रयोग केलाय आणि हे सुरक्षित आहे.

या गवतात कुमरिन नावाचा घटक असतो, ज्यात तेज गंध असतो, ज्यामुळे मच्छर पळवण्यासाठी त्याचा प्रयोग सुरक्षित आहे.

स्वीटग्रासमध्ये फायटल नावाचं रसायन आहे, ज्यामुळे मच्छर पळतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.