टीसीएस देणार २५,००० लोकांना नोकरी!

देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी ‘टाटा कंसल्टेंसी सर्विसेस’ (टीसीएस) यंदा २५,००० लोकांना नोकरी देणार आहे. फेब्रुवारीपर्यंत कॅम्पस सिलेक्शनद्वारे या उमेदवारांची निवड करण्यात येत आहे. कंपनीच्यावतीनं हे सांगण्यात आलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 22, 2013, 11:14 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरु
देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी ‘टाटा कंसल्टेंसी सर्विसेस’ (टीसीएस) यंदा २५,००० लोकांना नोकरी देणार आहे. फेब्रुवारीपर्यंत कॅम्पस सिलेक्शनद्वारे या उमेदवारांची निवड करण्यात येत आहे. कंपनीच्यावतीनं हे सांगण्यात आलंय.
टीसीएसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि वैश्विक प्रमुख अजय मुखर्जी यांनी सांगितलं की, ‘आम्ही प्रशिक्षण आणि कॅम्पस नियोजनाची प्रक्रिया सुरु केली आहे. आम्ही २५,००० लोकांना आणि विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देणार आहोत.’
जानेवारी- फेब्रुवारी पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. विविध संस्थांनात जाऊन कॅम्पसद्वारे लोकांची निवड करण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.