जिओनंतर या कंपनीची धमाकेदार ऑफर

मुकेश अंबानी यांनी जिओच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर आणल्यानंतर आता नॉर्वेच्या टेलीनॉर कंपनीने देखील एक जबरदस्त ऑफर लॉन्च केली आहे. 

Updated: Apr 14, 2017, 08:54 AM IST
जिओनंतर या कंपनीची धमाकेदार ऑफर title=

मुंबई : मुकेश अंबानी यांनी जिओच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर आणल्यानंतर आता नॉर्वेच्या टेलीनॉर कंपनीने देखील एक जबरदस्त ऑफर लॉन्च केली आहे. 

टेलीनॉरने नव्या ग्राहकांसाठी 103 रुपयांचा प्लॅन आणला आहे. यामध्ये 103 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर त्यांना तीन महिने वॉईस कॉलिंग आणि 60 दिवस अनलिमिटेड 4-जी इंटरनेट डेटा फ्री मिळणार आहे. सुरुवातीला ही ऑफर देशातील काही भागामध्येच दिली जाणार आहे.
  
ग्राहकांना या यामध्ये 25 रुपयांचा टॉकटाइम देखील दिला जाणार आहे. सोबतच लोकल आणि एसटीडी कॉल 25 पैसे/ मिनटच्या दराने चार्ज लागणार आहे. प्लानची वैधता 90 दिवसांची असणार आहे. यूजर्सला रोज 2जीबी डेटा मिळणार आहे.

टेलीनॉरचा हा नवा प्लान बीएसएनएलच्या 339 रुपयांच्या प्लान सारखा आहे.