व्हिडिओ: फक्त बोलून नाही, करून दाखवा!

आपल्या कळतं पण वळत नाही किंवा बोलणं खूप सोपी असतं करणं कठीण अशा म्हणी आपण ऐकल्या आहेत. पण आपला परिसर स्वच्छ ठेवणं हे काही कठीण आणि अशक्य काम नाही. त्याचसंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजतोय.  

Updated: Jan 1, 2015, 03:56 PM IST
व्हिडिओ: फक्त बोलून नाही, करून दाखवा! title=

मुंबई: आपल्या कळतं पण वळत नाही किंवा बोलणं खूप सोपी असतं करणं कठीण अशा म्हणी आपण ऐकल्या आहेत. पण आपला परिसर स्वच्छ ठेवणं हे काही कठीण आणि अशक्य काम नाही. त्याचसंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजतोय.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर... त्यांनी सर्व नागरिकांनाच स्वच्छतेसाठी आवाहन केलंय. प्रत्येक जण देश कसा स्वच्छ ठेवावा याबद्दल सांगत असतो. 

NISHEETH TV या नावाखाली पहिलाच व्हिडिओ यू-ट्यूबवर टाकला गेलाय आणि तो चांगलाच वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये काही व्यक्तींना देश कसा स्वच्छ ठेवावा, कोणकोणत्या बाबी टाळाव्या हे विचारण्यात आलंय. विशेष म्हणजे त्या लोकांनी जी उत्तरं दिलीत, त्यांनीच पहिले कशी अस्वच्छता पसरवली हे त्यांनाच दाखवलंय. 

एकूणच या व्हिडिओद्वारे त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय. 

पाहा हा व्हिडिओ - 

 

 
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.