आठ वर्षांच्या इवाननं 'यू ट्यूब'कडून कमावले 8 करोड!

वय वर्ष केवळ आठ... आणि हा चिमुरडा आज करोडपती बनलाय... तब्बल 8 करोड या चिमुरड्यानं यू ट्यूबवरून कमावलेत. 

Updated: Sep 23, 2014, 05:31 PM IST
आठ वर्षांच्या इवाननं 'यू ट्यूब'कडून कमावले 8 करोड! title=

मुंबई : वय वर्ष केवळ आठ... आणि हा चिमुरडा आज करोडपती बनलाय... तब्बल 8 करोड या चिमुरड्यानं यू ट्यूबवरून कमावलेत. 

8 वर्षांच्या या चिमुरड्याचं नाव आहे इवान... तो सोशल वेबसाईटवर ‘इवान ट्यूब एचडी’ चालवतोय. हे एक यू ट्यूब चॅनल आहे ज्यावर इवान, कधी त्याची आई तर कधी त्याची बहिण खेळण्याचा आणि व्हिडिओ गेम्सचा रिव्ह्यू करतात. 

याच खेळण्यांचा रिव्ह्यू प्रसिद्ध करून इवाननं गेल्या वर्षांत 13 लाख डॉलर (म्हणजेच, जवळपास 8 करोड रुपये) कमावलेत.  

हे यू ट्यूब चॅनल इवान आणि त्याच्या वडिलांनी मजेमजेत सुरु केलं होतं. एका मुलाखतीत इवानचे वडील जेरड म्हणतात, या यूट्यूब चॅनलवरून मिळणारी सगळी कमाई आपल्या मुलांच्या बचत खात्यात आणि गुंतवणुकीमध्ये लावली जातेय. 

जेरड यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे एक सेल्स टीम आहे. जाहिरातीसोबतच ब्रँडस् आणि बिझनेस डीलचं काम पाहते.

पाहा, इवानचा हा व्हिडिओ... जो आत्तापर्यंत 5 करोड वेळा पाहिला गेलाय...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.