www.24taas.com, झी मिडिया, अहमदनगर
आज भारतीय खगोल प्रेमींना या वर्षातील पहिले ग्रहण पाहता येणार आहे. गुरूवारी मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांनी हे ग्रहण देशाच्या सर्व भागातून पाहायला मिळणार आहे.
हे ग्रहण तब्बल २७ मिनीटे टिकणार असून २०१३ या वर्षात एकूण ३ ग्रहण पाहता येणार आहे. गुरूवारी मध्यरात्री असणारे हे भारताच्या सर्व भागातून हे ग्रहण दिसणार आहे. अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ नॅरटोम साहू यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये सायन्स सिटी आणि विज्ञान व तंत्रज्ञान समिती, गुजरात यांच्यावतीने काही कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा विषय ग्रहणांबाबत लोकांच्या समजूती दूर करणे असा आहे.