मोबाईलवर पॉर्न बघणाऱ्यांनो सावधान....

भारतात पॉर्नोग्राफी पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मोबाईल इंटरनेटचा विस्तार झाल्यानंतर मोबाईलमध्ये हे बघण्याचे प्रमाण वाढले. तुम्हाला वाटत असेल मोबाईलवरुन पॉर्न फिल्म पाहिल्यास कोणाला समजणार नाही. मात्र तसे नाही. 

Updated: Dec 14, 2015, 02:56 PM IST
मोबाईलवर पॉर्न बघणाऱ्यांनो सावधान.... title=

नवी दिल्ली : भारतात पॉर्नोग्राफी पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मोबाईल इंटरनेटचा विस्तार झाल्यानंतर मोबाईलमध्ये हे बघण्याचे प्रमाण वाढले. तुम्हाला वाटत असेल मोबाईलवरुन पॉर्न फिल्म पाहिल्यास कोणाला समजणार नाही. मात्र तसे नाही. 

तुम्ही ज्या काही वेबसाईट पाहता. ब्राऊसिंग करता त्या सर्वांची नजर तुमच्यावर असते. त्यामुळे मोबाईलवरुन पॉर्नफिल्म पाहत असाल तर सावधानता बाळगा

तुमच्या ऑनलाईन सवयी काही कंपन्या ट्रॅक करतात. या ट्रॅकिंगवरुन तुम्हाला ऑनलाईन कोणत्या जाहिरीत दाखवल्या गेल्या पाहिजेत हे ठरवले जाते. पॉर्न वेबसाईटची माहिती देणाऱ्या जाहिराती तुमच्याकडे ऑनलाईन दिसत असतील तर ते तुमच्यासाठी समस्या ठरु शकते. प्रायव्हेट ब्राउसिंग अथवा कुकीज डिलीट केल्यास तुम्ही ऑनलाईन ट्रॅकिंगपासून बचाव करु शकता. 

ऐशले मॅडिसन नावाच्या वेबसाईटचा डेटा लीक झाल्यानंतर लाखो लोकांची नावे पुढे आली होती. यात भारतातीलही अनेकांची नावे होती. यानंतर अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या. तर काहींना याद्वारे ब्लॅकमेलही करण्यात आले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.