नवी दिल्ली : मायक्रो-ब्लॉगिंग आणि नेटवर्किंग साइटमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ट्विटरने आपल्या यूजरसाठी नवे अॅप लॉन्च केले आहे. 'व्हीडिओ अॅप कार्ड' हे नवे फिचर आज शुक्रवारी लॉन्च केलेय.
सोशल मीडियामधील आघाडीवर असणारे ट्विटरने सातत्याने बदल करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून हे नविन अॅप लॉन्च केले. त्यामुले व्हीडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या उत्पनाची जाहीरातही करता येणार आहे.
ट्विटरने आपले यूजर वाढविण्यासाठी हे नविन अॅप लॉन्च केलेय. त्यासाठी व्हीडिओच्या माध्यमातून हे अॅप कसे हाताळायचे याची माहिती देण्यात येणार आहे, असे ट्विटरच्या सॅन फ्रान्सको येथील मुख्यालय कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Starting today, advertisers can now use video to promote their mobile apps on Twitter. https://t.co/1jJ02Oeiqg https://t.co/vnJIYVsEY0
— Twitter Advertising (@TwitterAds) September 24, 2015
मोबाईल अॅपच्या माध्यमातून आपले यूजर वाढविण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच अधिकाधिक यूजरपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मोबाईलच्या माध्यमातून व्हीडिओ पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ८२ टक्के लोक व्हीडिओ ट्विटरवर पाहतात. तर ९० टक्के लोक मोबाईलवर व्हीडिओ बघतात, असे ट्विटरच्या संशोधनातून पुढे आलेय. त्यामुळे हे नवे अॅप लॉन्च करण्यात येत असल्याचे ट्विटरने म्हटलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.