मुंबई : आयफोन-६ हा फोन १७ ऑक्टोबरपर्यंत भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, तीन दिवसात तब्बल एक कोटी फोनची विक्री झाली. ही विक्रमी विक्री असल्याचे सांगतले जात आहे.
आयफोनच्या स्मार्टफोन जगात खूप मागणी आहे. जवळपास लाखाच्या घरात किंमत असलेल्या आयफोन-६ आणि आयफोन-६ प्लस या अॅपलच्या अत्याधुनिक फोनच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्यावर उड्या पडत आहेत. गेल्या तीन दिवसांत तब्बल एक कोटी आयफोनची विक्रमी विक्री झाली आहे.
अॅपलने शुक्रवारी आयफोन-६ आणि आयफोन-६ प्लस हे दोन फोन अमेरिकेसह कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, हॉंगकॉंग, जपान, प्युरटोरिको, सिंगापूर आणि इंग्लंडमध्ये ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. विक्रमी विक्री होऊनही आपण समाधानी नसल्याचे अॅपलचे कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी सांगितले. दरम्यान, अॅपलवर विश्वास ठेवणार्या कोट्यवधी ग्राहकांचे त्यांनी आभार मानले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.