युट्यूबवर व्हिडिओ पाहताना वापरा शॉर्टकट की

स्मार्टफोन सध्या सगळ्यांच्याच हातात पाहायला मिळतो. फोन, टॅबवर व्हिडिओ पाहण्याचा ट्रेंड संध्या भलताच वाढला आहे. तुम्ही ही जर युट्यूबवर व्हिडिओ पाहात असाल तर या शॉर्टकट की तुम्हाला उपयोगी ठरू शकता. व्हिडिओ पाहत असताना तुम्ही यांचा वापर करू शकता.

Updated: Dec 20, 2015, 06:22 PM IST
युट्यूबवर व्हिडिओ पाहताना वापरा शॉर्टकट की title=

मुंबई : स्मार्टफोन सध्या सगळ्यांच्याच हातात पाहायला मिळतो. फोन, टॅबवर व्हिडिओ पाहण्याचा ट्रेंड संध्या भलताच वाढला आहे. तुम्ही ही जर युट्यूबवर व्हिडिओ पाहात असाल तर या शॉर्टकट की तुम्हाला उपयोगी ठरू शकता. व्हिडिओ पाहत असताना तुम्ही यांचा वापर करू शकता.

शॉर्टकट की :

१. व्हिडिओ पाहात असताना मध्येच थांबवण्यासाठी K दाबा.

२. व्हिडिओचा आवाज आवाज बंद करण्यासाठी M दाबा.

३. फूलस्क्रिन व्हिडिओ पाहण्यासाठी F दाबा.

४. 5 सेकंद मागे जाण्यासाठी J आणि 5 सेकंद पुढे जाण्यासाठी L दाबा.

५. व्हिडीओ पुन्हा पाहायचा असेल तर O दाबा.

६. व्हिडिओ जर तुम्हाला 10 समान वेगवेगळ्या भागात पाहायचा असेल तर तो आकडा दाबा त्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ त्या भागापासून पाहू शकता.