नवी दिल्ली : सध्या सोशल वेबसाईटवर पाणी शोषून घेणाऱ्या रस्त्याचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.
स्पेशल पद्धतीच्या काँक्रेटच्या साहाय्यानं बनवण्यात आलेला हा रस्ता ट्रकभर पाणी सहज पिताना दिसतोय. एखाद्या स्पंजप्रमाणे हा रस्ता पाणी पिताना या व्हिडिओत दिसतोय.
प्रति मिनिट ८८० गॅलन पाणी हा रस्ता शोषून घेतोय... आणि पुन्हा पृष्ठभाग कोरडाच... अशा पद्धतीचा रस्ता शहरांमध्ये खूपच फायदेशीर ठरू शकतो. पावसाळ्यात पुराचा धोका कमी करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो... तसंच उन्हाळ्याच्या दिवसांत डांबरापेक्षा हा रस्ता बराच थंड अनुभव देतो.
हे पाणी पुन्हा वापरता आलं तर दुष्काळाचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.