नवी दिल्ली: बाल हक्कासाठी लढणाऱ्या कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार दिल्यानंतर देशात बाल मजुरीची समस्या जशीच्यातशीच दिसतेय. याचा नमूना पाहायचा असेल तर देशाची सर्वोच्च संस्था संसदेसमोर जावून पाहावं. तिथं बालमजुरीचं दृश्य आरामात दिसेल.
जर आपण दिल्लीतील इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत पायी गेलात, तर त्यादरम्यान आपल्याला १४ वर्ष पेक्षा कमी वयाचे अनेक मुलं वेगवेगळ्या वस्तू विकतांना दिसतील. जेव्हा की हा कायद्यानं गुन्हा आहे. हेच दृश्य आपल्याला राजधानी दिल्लीतील अनेक पॉश भागांमध्ये, देशातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये पाहायला मिळेल.
जर देशाच्या राजधानीतच ही परिस्थिती आहे तर इतर महानगर, गावांमध्ये काय परिस्थिती असेल याचा विचारही आपण करू शकत नाही. दिल्लीतील कनॉट प्लेसच्या मॅक्डॉनल्डमध्ये बनलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय. यात बाल मजुरीच्या मुद्द्यावर बोट ठेवण्यात आलंय...
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.