वोडाफोनची ३५२ रुपयांत ५६ जीबी डेटा ऑफर

जिओला टक्कर देण्यासाठी आता टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी विविध ऑफर बाजारात आणतायत. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता वोडाफोनने ओन्ली फॉर यू हा नवा प्लान आणलाय.

Updated: Mar 9, 2017, 09:34 AM IST
वोडाफोनची ३५२ रुपयांत ५६ जीबी डेटा ऑफर title=

नवी दिल्ली : जिओला टक्कर देण्यासाठी आता टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी विविध ऑफर बाजारात आणतायत. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता वोडाफोनने ओन्ली फॉर यू हा नवा प्लान आणलाय.

या ऑफरअंतर्गत ग्राहकांना ३५२ रुपयांच्या रिचार्जवर ५६ जीबी डेटा ५६ दिवसांसाठी मिलणार आहे. इतकंच नव्हे तर डेटासोबत अनलिमिटेड कॉल्सचाही पर्याय ग्राहकांना मिळणार आहे. 

म्हणजेच केवळ ६ रुपयांत तुम्हाला १ जीबी डेटा मिळतोय. तसेच एका दिवसाला एक जीबी डेटा तुम्हाला वोडाफोन कंपनी देतेय. 

दरम्यान, ही ऑफर सर्वांनाच मिळणार नाहीये तर वोडाफोनच्या काही ग्राहकांना ही ऑफर मिळणार आहे.