व्होडाफोनने सुरु केली ‘ऑल इन वन’ रोमिंग सुविधा

दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियाने खासकरून दिल्ली आणि एनसीआर सर्कलमधील आपल्या प्रिपेड ग्राहाकांसाठी 'ऑल इन वन' रोमिंग पॅक उपलब्ध केला आहे. याता एकदाच रिचार्ज केल्यानंतर लोकल टॉकटाईम, एसटीडी, इन्कमिंग आणि आऊटगोईंग मिनट असणार आहे.

PTI | Updated: Sep 16, 2015, 11:18 AM IST
व्होडाफोनने सुरु केली ‘ऑल इन वन’ रोमिंग सुविधा title=

नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियाने खासकरून दिल्ली आणि एनसीआर सर्कलमधील आपल्या प्रिपेड ग्राहाकांसाठी 'ऑल इन वन' रोमिंग पॅक उपलब्ध केला आहे. याता एकदाच रिचार्ज केल्यानंतर लोकल टॉकटाईम, एसटीडी, इन्कमिंग आणि आऊटगोईंग मिनट असणार आहे.

कंपनीने म्हटलेय, आमचे ग्राहक देशात कुठेही प्रवास करताना लोकल टॉकटाईमचा आनंद घेऊ शकतात. त्याशिवाय कंपनीच्या दिल्ली आणि एनसीआरमधील ग्राहकांना जास्त कालावधीची वैधता पॅक उपलब्ध करुन देणार आहे.

६६ रुपयांमध्ये टॉपअपवर ९५ मिनिटे रोमिंग शुल्क मोफत टॉकटाईम मिळेल. याची वैधता २८ दिन असेल. तसेच १५६ रुपयांवर २३० मिनीट फ्री रोमिंगची सुविधा मिळेल. तसेच कंपनी याची वैधता वाढविण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा विचार करीत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.