पेट्रोल भरताना दगाबाजी टाळायची असेल तर...

पेट्रोल भरताना आपल्या गाडीत किंवा बाईकमध्ये टाकीच्या मापापेक्षा जास्त पेट्रोल भरल्याचं दाखवत आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार एव्हाना तुमच्यासोबतही घटला असेल... किंवा आपण जितक्या पैशांचं पेट्रोल भरण्यास सांगितलंय त्याहून कमी पेट्रोल भरल्याचंही तुमच्या लक्षात आलं असेल... पण, ही पेट्रोल चोरी ओळखणार कशी? आणि ती टाळणार कशी असे प्रश्न तुमच्या मनात उभे राहिले असतील... तर याच प्रश्नांवर ही उत्तरं... पुढच्या वेळी पेट्रोल चोरी टाळण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल. 

Updated: Oct 25, 2014, 07:52 PM IST
पेट्रोल भरताना दगाबाजी टाळायची असेल तर... title=

मुंबई : पेट्रोल भरताना आपल्या गाडीत किंवा बाईकमध्ये टाकीच्या मापापेक्षा जास्त पेट्रोल भरल्याचं दाखवत आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार एव्हाना तुमच्यासोबतही घटला असेल... किंवा आपण जितक्या पैशांचं पेट्रोल भरण्यास सांगितलंय त्याहून कमी पेट्रोल भरल्याचंही तुमच्या लक्षात आलं असेल... पण, ही पेट्रोल चोरी ओळखणार कशी? आणि ती टाळणार कशी असे प्रश्न तुमच्या मनात उभे राहिले असतील... तर याच प्रश्नांवर ही उत्तरं... पुढच्या वेळी पेट्रोल चोरी टाळण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल. 

- प्रत्येक पेट्रोल पंपमध्ये पेट्रोलसाठी १ लीटर, २ लीटर अशी मापं असतात. यामुळे, पेट्रोल पंपावर लीटरमागे चोरी केली जाऊ शकत नाही. 

- पेट्रोल चोरीसाठी साधारणत: पेट्रोल भरताना १०० रुपये, २०० रुपये किंवा ५०० रुपये अशी सेटींग केली जाते. 

- १०० रुपये, २०० रुपये, १००० रुपये किंवा अशा किंमतीत आलेलं पेट्रोल आपण मोजू शकत नाही, त्यामुळे अशावेळी पेट्रोल चोरी आपल्याला चटकन ओळखता येत नाही.

- त्यामुळेच जेव्हा तुम्ही पेट्रोल भरता तेव्हा १०५ रुपये, २०५ रुपये किंवा १ लीटर २५५ रुपये अशा थोड्या हटके अंकांमध्ये भरण्यासाठी सांगा... अशावेळी पेट्रोल भरताना पेट्रोल चोरी टाळता येते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.