‘व्हॉटस अप’नं बचावले त्याचे प्राण...

Updated: Jun 24, 2014, 02:24 PM IST
‘व्हॉटस अप’नं बचावले त्याचे प्राण...  title=

 

बंगळुरू : तुमच्यासाठी ‘व्हॉटस अप’ केवळ संदेश पाठवण्याचा एक पर्याय असेल... पण, एका युवकासाठी मात्र हेच व्हॉटस अप तारणहार ठरलंय. या मोबाईल अॅप्लिकेशननंच रविवारी रात्री उशीरा कर्नाटकच्या मदुगरिमध्ये एका तरुणाचा जीव वाचवलाय.

मुळचा दिल्लीला राहणारा 24 वर्षांचा गौरव अरोडा फिरण्यासाठी म्हणून कर्नाटकला गेला होता. गौरव का कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. बंगळुरूपासून 40 किलोमीटर दूर मदुगिरीच्या डोंगररांगांवर रॉक क्लाईंबिंग करताना त्याचा तोल गेला आणि जवळपास 300 फूट उंचीवरून तो खाली पडला. जवळपास 10 तास तो याच ठिकाणी वाईट अवस्थेत होता. 
त्याचा याच अवस्थेत मृत्यूही झाला असता पण, त्याला एक युक्ती सुचली आणि त्यानं आपल्या या अवस्थेतला एक फोटो काढून व्हॉटस अपवर आपल्या एका मैत्रिणी धाडला. त्यामुळे, पोलिसांना या घटनेची सूचना आणि माहिती देण्यास मदत झाली. 

गौरव ज्या टोकावरून घसरला होता तो आशियाचा सगळ्यात जास्त उंचीचा ‘सिंगल रॉक हिल’ म्हणून ओळखला जातो. पडल्यानंतर गौरव बराच जखमी झाला होता... पण, याही अवस्थेत त्यानं त्याच्या प्रियांका नावाच्या मैत्रिणीला आपला एक या अवस्थेतला फोटो व्हॉटसअपवर पाठवला.  

हा फोटो मिळाल्यानंतर प्रियांकानं तत्काळ पोलिसांना गाठलं. स्थानिक पोलिसांनी जागेचा अंदाज घेतला आणि गौरवला शोधून काढलं... आणि त्यामुळेच गौरवचा जीव वाचू शकला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.