www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय मोबाईल कंपनी कार्बननं आपला एक नवीन स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. मोठा स्क्रीन आणि अँन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमसह दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होणाऱ्या या स्मार्टफोनचं नाव आहे ‘टायटॅनियम एस 9 लाईट’...
हा स्मार्टफोन सध्या अनेक मोबाईल शॉप्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलाय. मागच्या वर्षी लॉन्च करण्यात आलेल्या ‘एस 9’ या स्मार्टफोनचं कमी बजेटमधलं व्हर्जन म्हणजे ‘टायटॅनियम एस 9 लाईट’ असं कंपनीकडून सांगण्यात येतंय.
हा स्मार्टफोन काळा आणि सफेद अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमधल्या काही त्रुटी म्हणजे, याचा रॅम लिमिटेड स्वरुपाचा आहे तसंच यामध्ये अॅन्ड्रॉईड 4.2 जेली बिन हे जुनं सॉफ्टवेअर वापरण्यात आलंय.
‘टायटॅनियम एस 9 लाईट’ची काही वैशिष्ट्यं...
- 5.5 इंचाचा (960 X 540 पिक्सल) qHD IPS डिस्प्ले
- 1.3 गिगाहर्टझ क्वाड-कोअर प्रोसेसर
- अँन्ड्रॉईड 4.2 (जेली बिन)
- ड्युएल सिम (जीएसएम + जीएसएम)
- 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा (एलईडी फ्लॅशसहीत)
- 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 3.5 एमएम ऑडिओ जॅक
- 512 एमबी रॅम, 4 जीबी इंटरनल मेमरी, 32 जीबी एक्स्पान्डेबल मेमरी (मायक्रो एसडीसहीत)
- थ्रीजी, वाय-फाय 802.11 b/g/n, ब्लू टूथ, जीपीएस
- 2100 मेगाहर्टझ बॅटरी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.