व्हॉट्सअॅपचं 'last seen' कसं लपविणार

 व्हॉट्सअॅपवर प्रत्येकवेळी कोणी ना कोणी मेसज पाठवत असतं. तुम्ही थोड्या वेळात उत्तर नाही दिले तर लोक त्यावर टोमणे मारतात आणि तसे मेसेज पाठविले जातात. 

Updated: Dec 11, 2015, 09:36 PM IST
व्हॉट्सअॅपचं 'last seen' कसं लपविणार title=

मुंबई :  व्हॉट्सअॅपवर प्रत्येकवेळी कोणी ना कोणी मेसज पाठवत असतं. तुम्ही थोड्या वेळात उत्तर नाही दिले तर लोक त्यावर टोमणे मारतात आणि तसे मेसेज पाठविले जातात. 

अनेक लोक असेही म्हणतात की मेसेज पाहिला आणि त्याला रिप्लाय केला नाही. अशा लोकांच्या पारखी नजरेतून वाचण्यासाठी एक अॅप मदत करू शकतो. 

डब्ल्यू टुल्स असे या अॅपचे नाव आहे. त्याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपचा मेसेज वाचू शकतात. पण कोणाला माहीत होणार नाही की तुम्ही मेसेज वाचला आहे. तसेच तुम्ही ऑनलाइन आहात हे  तुमच्या मित्रांना कळू शकणार नाही. या इन्स्टॉल केल्यावर व्हॉट्सअॅपवर 'lAST SEEN" हे फिचर अपडेट करू शकत नाही. 

या अॅपचा वापर करून तुम्ही तुम्ही होम स्क्रिनवर जाऊन 'हाईड लास्ट सीन' ऑप्शन निवडवं लागले. त्यानंतर तुम्ही कोणते कनेक्शन वापरतात हे सिलेक्ट करायचे असते. वायफाय की मोबाईल इंटरनेट... त्यानंतर स्क्रिनवरील 'स्टार्ट सर्व्हिस' यावर टॅप करा. डब्ल्यू टुल्स हे आता तुमच्यासाठी बॅकग्राऊंडमध्ये काम करणार... दुसऱ्यांना माहिती नसताना तुम्ही मेसेज वाचू शकतात. 

त्यानंतर हे फिचर डिसेबल करायचे असेल तर होम स्क्रिनवर जाऊन हाइड लास्ट सीनला सिलेक्ट करून मागील प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. 

व्हॉट्सअॅपवर तुम्ही 'लास्ट सीन' असे फिचर लपविले तर तुमच्याबद्दल लोक जाणू शकणार नाही. हा अॅप स्थिती बदलून टाकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.